सागरी सर्पाची नवी जात सापडली (University of Queensland scientist discovers a new sea snake-Hydrophis donaldii)


उत्क्रांतीच्या सिद्धांताबाबत नवी माहिती हाती येण्याची शक्यता
पी.टी.आय. वॉशिंग्टन


प्रा. ब्रायन फ्राय Hydrophis donaldii या समुद्री सर्पाच्या नवीन जातीसोबत (Photo credit:Brian G. Fry)
"All venomous animals are bio-resources and have provided sources of many life-saving medications."
Image: tswinner/iStockphoto

 ऑस्ट्रेलियाच्या समुद्राने तीन बाजूंनी वेढलेल्या कारपेण्टेरिया आखातात नव्या जातीचा समुद्री सर्प आढळल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या सापामुळे उत्क्रांतीच्या सिद्धांताबाबत काही नवी माहिती हाती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माशांहून अधिक प्रमाणात वाढलेले खवले असल्यामुळे या सर्पाचे ‘हायड्रोफिस डोनाल्डी’ असे शास्त्रीय नामकरण करण्यात आले असल्याचे क्वीन्सलॅण्ड विद्यापीठाच्या संशोधक गटाने सांगितले. हा सर्प समुद्रात अत्यंत  खोल आणि दूरवर  राहात असल्याने त्याचे आजवर सर्वेक्षण शक्य झाले नव्हते, त्याचबरोबर व्यावसायिक पातळीवर मासेमारी करणाऱ्या गटांनाही तो सापडला नव्हता, असे प्राध्यापक ब्रायन फ्राय म्हणाले. अतिमासेमारीमुळे समुद्री सर्पाच्या संख्येमध्ये घट झाली असली, तरी एका रात्रीमध्ये २००हून अधिक  जातींचे समुद्री सर्प आढळतात. नव्या जातीचा सर्प या भागातून मिळणे ही केवळ संशोधकीय उपलब्धी नाही. सर्व विषारी प्राणी मानवाला उपकारक ठरणाऱ्या औषधांच्या निर्मितीत उपयुक्त ठरतात. उच्च रक्तदाब, मधुमेह यांच्यावर गुणकारी औषधे विषापासूनच तयार केली जातात. या सर्पाच्या विषापासूनही औषध तयार करण्यात येऊ शकते, असे फ्राय यांनी नमूद केले.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...