![]() |
वायंगणीच्या किनाऱ्यावरील 'ऑलिव्ह रिडले' कासवे. (संग्रहित छायाचित्र) |
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी गावचा किनारा ऑलिव्ह रिडले कासवांचा आवडता आहे. दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात ही कासवे या किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. या अंड्यांचा गावकरी सांभाळ करतात. ही अंडी चोरली जाऊ नयेत, तसेच कुत्रे किंवा अन्य प्राण्यांकडून त्यांचे भक्षण होऊ नये, यासाठी गावकरी या अंड्यांची विशेष काळजी घेतात. कासवांच्या संवर्धनासाठी हे गाव व हा किनारा प्रसिद्धीला आला आहे. या वर्षी सापडलेल्या अंड्यांच्या पहिल्या तुकडीतील पिल्ले येत्या ता. चार ते सहा फेब्रुवारीला समुद्राकडे परततील असा अंदाज आहे. त्या काळात वायंगणीच्या ग्रामस्थांनी किरात ट्रस्टच्या सहकार्याने "कासव जत्रा'ही आयोजित केली आहे.
कासवांच्या पिलांच्या जन्मसोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी या जत्रेत सहभाग घेता येईल. या जत्रेत कोकण किनाऱ्यावरची डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारीचा अनुभव, पक्षी निरीक्षणासाठी जंगलातून भटकंती, पाणी तज्ज्ञांशी गप्पा असे कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत.
संतोष शेणई - सकाळ वृत्तसेवा
0 Comments:
Post a Comment