पोपट हरवले (Threat to parrot existence in India)

शिवाजी अभिमान शेळके, बार्शी (सोलापूर),लोकसत्ता संदर्भ सेवा 

पक्ष्यांमध्ये पोपट असा पक्षी आहे जो शिकवल्यानंतर मनुष्याच्या भाषेत काही वाक्य बोलू शकतो. या गुणवैशिष्टय़ामुळे  लहान मुलांच्या भावविश्वात बालपणी चिऊ-काऊनंतर पोपटाचे स्थान येते.पोपटाच्या सुंदर रंगसंगती, रुबाबदार आकार, बोलण्याच्या वैशिष्टय़ांमुळे मराठी,  हिंदी गाण्यांमध्ये कोकिळा, मोरानंतर पोपटाला स्थान मिळाले आहे. पोपटावर अनेक गाणी हिट-सुपरहीट झाली आहेत.
मानवी भावविश्वाशी जोडलेला पोपट आज दुर्मीळ होत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. २०-२५ वर्षांपूर्वी पोपटांचे थवेच्या थवे दिसत असत. आज पोपट शोधावे लागतात एवढय़ा प्रचंड प्रमाणात त्यांची संख्या कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोपटांचे आवडते खाद्य हिरवी मिरची, सूर्यफूल, पेरू इ. आहे. शेतकरी जादा उत्पन्न घेण्यासाठी हिरव्या मिरचीवर, सूर्यफुलावर  कीटकनाशके फवारतात. याचा परिणाम पोपटांच्या संख्येवर झाला आहे. परंतु सर्वात जास्त भयानक परिणाम पोपटांची निवासस्थाने नष्ट झाल्यामुळे झाला आहे. पोपट झाडाच्या ढोलीत आपले घरटे बनवतात. त्यामुळे त्यांची अंडी सापांच्या भक्ष्यस्थानी पडतात. अशा ढोली खूप जुन्या झाडांमध्ये तयार होतात. आज ढोली योग्य झाडांची तोड मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे पोपटांची निवासस्थानेच नष्ट  झाली आहेत. याचा परिणाम पोपटाच्या प्रजननावर झाला आहे आणि पोपट दुर्मीळ होत चालले आहेत.
पर्यावरणातील, अन्नासाखळीतील, परिसंस्थेतील प्रत्येक घटक  महत्त्वाचा आहे हे सगळेच जाणतात. परंतु प्रत्येक घटकाचे संरक्षण व संवर्धन केले तरच हे जाणणे सार्थकी ठरेल. पोपटांची  निवासस्थाने वाचवायला पाहिजेत. यासाठी जुन्या  झाडांचे रक्षण करणे आवश्यक आहे. आज अनेक महामार्गाचे रुंदीकरण करताना जुन्या झाडांची कत्तल होत आहे. महामार्ग ९ वरील रुंदीकरणातही प्रचंड वृक्षतोड झाली आहे. या झाडांची परत लागवड झाली पाहिजे. पुनर्लागवड झालेल्या झाडांत ढोली सहज बनतील व पोपटांची निवासस्थाने तयार होतील. परिणामी पोपटासारखा सुंदर, रुबाबदार, बोलणारा पक्षी वाचू शकेल.

भवताल व्यासपीठ
पर्यावरणाच्या आपल्या परिसरातील समस्या व मुद्दय़ांवर आपली मते पाठवा.
पत्ता- लोकसत्ता, एक्स्प्रेस हाऊस, १२०५/०२/०६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११००४
ईमेल- hawa.pani@expressindia.com

Image credit:Mr.Thakur Dalip Singh(www.birdsofindia.com)

 पोपटांच्या अस्तित्वासाठी प्रयत्न करणाऱ्या परदेशातील एका संस्थेविषयी  जाणून घेण्यासाठी या website च्या पत्त्यावर click  करा.
http://www.parrotsr4ever.com/Eco.aspx


In the native homelands of our feathered companions, the battle of man vs. beast rages on. Most species of parrots in the wild exist in an endangered state, some on the brink of extinction, due in no small part to the handy-work of mankind, poaching and habitat encroachment/destruction. It might seem at first glance that the survival needs of parrots in the wild and those of the local human inhabitants are mutually exclusive. In the current state, what is good for the parrots harms the local economy, thus man. What is good for the economy and mankind is almost solely responsible for the instability in the populations of parrots in the wild, not to speak of the disappearing rainforest.
 
For more information please visit this site:

1 Comment:

aativas said...

हरीयानात मात्र मला नेहमीच खूप पोपट दिसतात - त्याचे काय कारण असावे?

Related Posts Plugin for WordPress, Blogger...