नागपूर, ८ मे/ प्रतिनिधी
नागपूरच्या पक्षीकोषात आणखी एका नव्या पक्ष्याची भर पडली असून पक्षीमित्र तरूण बालपांडे आणि किशोर खांडेकर यांना उमरेडजवळच्या तलावाजवळ रंगीत पाखुर्डी हा पक्षी आढळून आला. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव ‘पेन्टेड सँडग्राऊस’ असे आहे. अतिशय दुर्मिळ असलेला हा पक्षी भारतात आढळून येत असला तरीही नागपुरच्या इतक्याजवळ पहिल्यांदाच आढळला. या पक्ष्याची नोंद नागपुरच्या चेकलिस्टमध्ये नव्हती. दगडी छोटय़ा पहाडी परिसरात हा पक्षी प्रामुख्याने आढळतो.
डेझर्ट बर्ड म्हणूनसुद्धा या पक्ष्याची ओळख आहे. छोटय़ा झाडांच्या बिया हे याचे मुख्य खाद्य आहे. या पक्ष्याचे वैशिष्टय़ म्हणजे इतर पक्षी ज्याप्रमाणे वारंवार चोच पाण्यात बुडवून पाणी पितात तसे हा पक्षी करीत नाही. रंगीत पाखुर्डी हा एकदा पाण्यात चोच बुडवल्यानंतर जितके पाणी पिता येईल तितके पिऊन घेतो. दुसऱ्यांदा तो पाण्यात चोच बुडवत नाही. प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये हा पक्षी आढळून येतो.
![]() |
Painted sandgrouse(image:wikipedia) |
डेझर्ट बर्ड म्हणूनसुद्धा या पक्ष्याची ओळख आहे. छोटय़ा झाडांच्या बिया हे याचे मुख्य खाद्य आहे. या पक्ष्याचे वैशिष्टय़ म्हणजे इतर पक्षी ज्याप्रमाणे वारंवार चोच पाण्यात बुडवून पाणी पितात तसे हा पक्षी करीत नाही. रंगीत पाखुर्डी हा एकदा पाण्यात चोच बुडवल्यानंतर जितके पाणी पिता येईल तितके पिऊन घेतो. दुसऱ्यांदा तो पाण्यात चोच बुडवत नाही. प्रामुख्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये हा पक्षी आढळून येतो.
0 Comments:
Post a Comment