सापाची नवी प्रजाती अन् जिवंत पश्चिम घाट (Discovery of New species of Snake In Western Ghat)


 जैवविविधता आणि नैसर्गिक साधनसंपत्तेच्या दृष्टीने पश्चिम घाट का महत्त्वाचा, हे अलीकडेच एका घडामोडीमुळे पुन्हा सर्वासमोर आले. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या सदस्यांनी पश्चिम घाटात अलीकडेच सापाची नवी प्रजाती शोधून काढली. त्यामध्ये या संस्थेचे संशोधक वरद गिरी यांनी प्रमुख भूमिका बजावली. महाराष्ट्रमधील सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आंबोली येथे २००१ मध्ये सापांच्या जातींविषयी संशोधन करणारे कॅप्टन अशोक आणि त्यांचे सहकारी केदार भिडे यांना सापाची एक नवीन जात आढळली. सापाचे विविध रीतीने फोटो काढले असता त्यांना समजले, की ही सापाची जात श्रीलंकेत आढळणाऱ्या ‘डेंड्रालॅपिस बायफ्रेनालिस’ या प्रजातीच्या जवळची आहे. त्याच जातीचा अजून एक साप तब्बल दोन वर्षांनी वरद गिरी आणि समीर किहीमकर यांना गोव्यातील जंगलात मृत अवस्थेत सापडला. तो साप आंबोली आणि कर्नाटक भागातही आढळला. गिरी तो साप पुढील संशोधनासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ येथे घेऊन आले. ‘डेंड्रालॅपिस बायफ्रेनालिस’ नाव असणारी ही जात दरम्यानच्या काही वर्षांत पश्चिम घाटामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून आली.
जर्मनीतील विख्यात सर्पविशारद डॉ. जेरनॉट वोजेल यांनी २००९ मध्ये ‘डेंड्रालॅपिस बायफ्रेनालिस’ या जातीविषयी अभ्यास करण्यासाठी ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ या संस्थेला भेट दिली. त्या वेळी वरद गिरी यांनी आंबोली येथे त्यांना सापडलेल्या सापाविषयी माहिती दिली. डॉ. वोजेल आणि त्यांच्या साहाय्यकांनी मिळालेल्या छायाचित्रांच्या आधारे या सापाच्या नवीन जातीवर आणि त्यासारख्या वाटणाऱ्या बाकी जातींवर विविध संशोधन केले.
‘डेंड्रालॅपिस बायफ्रेनालिस’ हा साप ज्या डेंड्रालॅपिस उपकुळातील आहे, त्या उपकुळातील साप पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया व चीन या देशांमध्येही आढळतात. ते साप जास्त करुन झाडावर राहतात आणि त्यांचा रंग मुख्यत: ब्रॉन्झसारखा असतो. जेव्हा हे साप आक्रमक होतात तेव्हा ते स्वत:च्या त्वचेचे प्रसरण करतात. अशावेळी त्यांच्या खवल्यांमधील निळ्या रंगाची त्वचा दिसते. भारतामध्ये डेंड्रालॅपिस वर्गातील अंदाजे १० जातींचे सर्प आढळतात. डॉ. वोजेल व डॉ. रुजेन यांनी या नवीन शोध लागलेल्या सापाच्या जातीचे नाव ‘डेंड्रालॅपिस गिरी’ असे ठेवले आहे. संशोधक वरद गिरी यांनी केलेल्या कामाची ही पावतीच आहे. तसा उल्लेख या दोन दिग्गज संशोधकांनी आपल्या शोधनिबंधातही केला आहे. सध्याच्या नोंदीनुसार ‘डेंड्रालॅपिस गिरी’ ही सापाची जात भारताच्या पश्चिम घाटाच्या कर्नाटक, तामिळनाडू व महाराष्ट्राच्या विविध भागात आढळते.
या संशोधनाने आणि सापांच्या आढळळेल्या या नव्या प्रजातीने एक बाब स्पष्ट केली, ती म्हणजे- पश्चिम घाट इतका जिवंत आणि महत्त्वाचा आहे की, तिथे अजूनही बरेच काही सापडू शकते. येथे लहान-मोठे कीटक, छोटय़ा वनस्पतींच्या प्रजाती किंवा लहान प्रजाती नव्याने सापडत असतातच. पण आता सापाची इतकी प्रमुख जात नव्याने येथे सापडल्याने त्याचे वैशिष्टय़ पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सध्या पश्चिम घाटावर विविध प्रकारांनी इतके अतिक्रमण सुरू आहे की, पुढच्या काळात त्याचे वैशिष्टय़ आपण टिकवणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पश्चिम घाटाचा ‘जिवंतपणा’ही या संशोधनाने पुढे आला आहे.


बातमी स्रोत:लोकसत्ता

New species of snake discovered in Western Ghats:
A New species of snake that mainly inhabits the Western Ghats has been identified. Named Dendrelaphis girii, the reptile was first spotted in Amboli village in Sindhudurg district of Maharashtra in 2001 by a group of nature enthusiasts.
It is named after Varad Giri of Bombay Natural History Society who brought it from Goa.


The snake has been named after Varad Giri of Bombay Natural History Society who first took a specimen for further studies
 A new species of snake that mainly inhabits the Western Ghats has been identified. Named Dendrelaphis girii, the reptile was first spotted in Amboli village in Sindhudurg district of Maharashtra in 2001 by a group of nature enthusiasts. It was then identified as snake belonging to the genus Dendrelaphis bifrenalis, a species from Sri Lanka.


Two years later, Varad Giri, deputy director and curator of the herpetological collection with the Bombay Natural History Society (BNHS) saw a similar snake during his visit to Goa and took a specimen for further studies. He, too, identified it as a snake belonging to Dendrelaphis bifrenal genus.


The new species of snake called Dendrelaphis girii mainly inhabits the Western Ghats (Photos: Sameer Kehimkar)


  It was only in 2009 when Gernot Vogel, an expert on snake taxonomy from Germany, visited BNHS to study snake specimen it was noted that the snake is a new species.“The snakes of the genus Dendrelaphis are widely distributed in northwestern Pakistan, east and southern parts of Australia and southern China. “They are commonly called bronzeback tree snakes. These snakes are mostly arboreal and have predominantly bronze colouration.


When they are aggressive they expand their skin and a blue coloured skin in between the scales is visible. In India, there are about ten species of Dendrelaphis known from across the mainland and islands,” says Giri.


This new species has a black coloured stripe behind the eye which barely extends to the neck. It has been named after Giri. The findings were published in the December 20 issue of Taprobanica.


News Source:Ashwin Aghor
Link : http://www.downtoearth.org.in/content/new-species-snake-discovered-western-ghats

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...