पक्षीयात्रा : निलांग : Verditer flycathcher

सौजन्य - छायाचित्र  आणि माहिती -  कौस्तुभ पांढरीपांडे,लोकसत्ता .
विदर्भात शुष्क पानगळीच्या जंगलात हिवाळ्यात आढळणारा अतिशय सुंदर असा पक्षी. आकार बुलबुल पक्षाच्या आकारा एवढा असतो. नर आकाशी निळ्या रंगाचा असून डोळ्याजवळ काळा रंग असतो. मादी रंगाने फिकट असते. खाद्यात माशा-कीटक यांचा प्रामुख्याने समावेश असतो म्हणून याचे इंग्रजी नाव फ्लायक्यचर.
हिवाळ्यात हिमालयातून ग्रामीण जंगलाच्या भागात स्थलांतर करतो. हिमालयात एप्रिल ते जुलै दरम्यान घरटी तयार करतो. ४ फिकट गुलाबी रंगाचे, ज्यावर एक कडावर गडद गोल रिंग असते अशी अंडी घालतात. नर-मादी मिळून पालकत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. 

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...