पुस्तकाचा कोपरा : अनोखा ‘पक्षीमेळा’

राम देशमुख (दै. लोकसत्ता):

जीवनात नानापरीचे छंद जोपासले जातात. र्निबध येऊनही छंद सुटत नाहीत. कारण छंद हेअभिरुची- सापेक्ष असतात. संगीत हा एक छंदच आहे. लेखन-वाचन, चित्ररेखाटन हेही छंदच. पक्ष्यांचे निरीक्षण हा असाच एक छंद. अरण्य तपस्वी मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर, सलीम अली ही नावे पक्षीनिरीक्षणाच्या आकाशात सप्तवर्षीतल्या तीन ठळक ताऱ्यासारखीस्थिरावलेली आहेत.नव्या पिढीने जुन्यांचा हा छंद जोपासावा त्यांच्या पावलावर पाऊल टाकूनआणखी दोन पावले पुढे जावे, कुठल्याही शास्त्रात गतीमानी महत्त्वाची असते. निरीक्षक काय, संशोधक काययांच्याकडून सामान्यजनांना हीच अपेक्षा असते. प्र. सु. हिरुरकर या पक्षीवेडय़ा तरुणाने हे तथ्य हेरून आपलीवाटचाल सुरू केली, ही समाधानाची गोष्ट आहे. या छंदाचे पर्यवसान म्हणजेपक्षीमेळाहे त्याचे ऋचा प्रकाशनाने तेप्रसिद्ध केले आहे.
प्रदीप हिरुरकरांनी गेली किमान दोन दशके अरण्य भटकंती करून जे अरण्यधन गोळा केले त्याचा ऐवजयाआधीच्या त्यांनी लिहिलेल्याअरण्यओढआणिभुलनवेलया दोन ग्रंथात संग्रहित झाला आहे. पक्षीमेळा हेहिरुरकरांचे तिसरे पुस्तक. या पुस्तकाचा बाज वेगळा आहे. पुस्तकाचा मूळ उद्देश कुमार वाचकांना पक्षीजगताचीतोंडओळख करून देण्याचा आहे.
पक्षिमेळा या पुस्तकाच्या आरंभी लेखकाचे जे मनोगत आहे, त्यात लेखकाने पक्षीजगताचा जो परिचय दिला आहेत्यावरून पक्ष्यासारख्या मानवेतरांचे जगही किती वैशिष्टय़पूर्ण आणि वैचित्र्याने भरलेले आहे, याची जाण थक्ककरून सोडणारी आहे.
मनोगत वाचता वाचता डोंगर मैना, वणकी, अडई ही पक्षीमेळ्यातली मंडळी वाचकांना भेटते. टिटवी, रातवापक्ष्याची दगड-धोंडय़ात बांधलेली घरटीही दिसतात. टिबुकली, चांदी या पक्ष्यांची जलवनस्पतींनी बांधलेली घरटीचीकुतूहलाचा विषय आहे.
पक्ष्यांचे जीवन आणि त्यांची कलात्मकता समजावून घेतानाच लेखक आपल्या पक्ष्यांविषयी अज्ञात असलेल्याकितीतरी गोष्टींची माहिती देतो. उदा. पृथ्वीवर पक्ष्यांच्या ८६५० जाती आहेत. भारतात २१०० पक्षीकुळे आहेत. एकटय़ा महाराष्ट्रात पक्ष्यांच्या ६५० जाती आहेत, हे वाचून आपल्या पक्षीज्ञानात महत्त्वाची भर पडते.
हिरुरकर ओघा-ओघांत पक्ष्यांविषयी आपला निष्कर्ष काढतात, की हजारो जातींच्या जीवमात्रांना अनुकूल असेविविध प्रकारचे वातावरण या देशात मिळते म्हणूनच जगामध्ये आढळणाऱ्या विविध जातींचे पक्षी भारतातआहेत.आपल्या निष्कर्षांप्रत जाण्याची अशी तर्कशुद्ध दृष्टी लेखकाला आहे. त्यामुळे या लेखनाला संशोधनाचीपाश्र्वभूमी लाभते.
माणसाला जशी वंशसातत्याची जाण असते तशी ती पाखरांनाही असते. आपल्या जीवनाचा मागीलांना उपयोगव्हावा म्हणून पक्षी सहजप्रेरणेने आचरित असलेली ही सामाजिक बांधीलकी शिकायला कुठल्याही शाळेत गेलेलेनाहीत. तरीही समर्पणाची उदात्त बुद्धी पक्ष्यांत आहे. पक्षी हा अनेक दृष्टीने माणसाचा गुरू आहे. कदाचित ही बुद्धी, हीवृत्ती पाखरांपासूनच माणसात संक्रमित झाली असेल. पाखरू संस्कृतीच्या उदय काळापासूनच माणसाचे मार्गदर्शकझाले आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही एवढेच.
पक्षीमेळा हे एकूण ६८ पक्ष्यांच्या माहितीवर आधारित पुस्तक असल्यामुळे सृष्टी विज्ञान जाणून घेण्याच्या दृष्टीनेते उपयुक्त महत्त्वाचे पुस्तक आहे, यात शंका नाही. या पुस्तकातून देशी सर्वत्र आढळणाऱ्या पक्ष्यांपासूनविदेशी स्थलांतरित पक्ष्यांपर्यंत लेखकाने घेतलेला पक्ष्यांपासून बोध अनुभव हे या पुस्तकाचे ठळक वैशिष्टय़आहे. त्यासाठी कान्हा-किसली, सायलेण्ट व्हॅलीसारख्या दूरस्थ अभयारण्यात त्यांनी भटकंती केली आहे. तसामेळघाटही पायाखाली तुडवला आहे.
मालखेड जलाशय, वि. . वि. परिसर, वडाळी, छत्री, शेवती तलाव अशी स्थानिक भ्रमंतीही पक्षीनिरीक्षणासाठीत्यांनी केली आहे. विशेष म्हणजे घराच्या अंगणातूनही येणाऱ्या जाणाऱ्या पक्ष्यांवर त्यांचे लक्ष असते, यावरूनपक्षीनिरीक्षणाची त्यांची असोशी किती बलवत्तर आहे, याची सहज कल्पना येते.
पक्षीमेळा या पुस्तकात बाराव्या क्रमांकावरचा शिक्रा हा शिकारी पक्षी आहे. कोल्हापूरच्या रंकाळा तलावावर असेसाधम्र्य असलेला तिरंदाज या नावाने ओळखला जाणारा पक्षी आहे. शिक्रा आपल्याहून लहान दुर्बल पक्ष्यांचीहवेतून शिकार करतो. तर तिरंदाज पाण्यात राहून मासा पकडतो. मग चोचीतला मासा तो हवेत फेकतो नि पुन्हामाशाला तोंडाकडून चोचीत पकडतो फाडून खातो. पक्षीजगत हे अशा अनेक आश्चर्यकारक घटनांचे जग आहे.
या जगाकडे लक्ष वेधून घेणारा हा पक्षीमेळा आहे. मेळा या सात्विक शब्दाने ज्या समुदायाचा बोध होतो, तोध्यानात घेता पक्षीमेळा हे पुस्तकाचे शीर्षक उचितच आहे. भक्त-भागवतांचा मेळा, गोपाळांचा मेळा तसा हाउडूगणांचा (पक्षी) मेळा. या पुस्तकाची छपाई, मांडणी नीटनेटकी आहे. आतील छायाचित्रामुळे पक्ष्यांची ओळखअधिक घट्ट होते त्यातून पक्ष्यांचे अमूर्त अवबोध स्पष्ट होतात.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...