लावण्य फुलपाखरांचे!

सकाळ वृत्तसेवा
फुलपाखरांनी फुलावर हुंदडाव. सुंदरतेचा रसही चाखावा. हा आनंद जर कुणाच्या नशीबाला येत असेल तर तो फुलपाखरांच्या. निसर्गातील फुलपाखरांचे हे लावण्य पाहातच राहाव वाटत . श्रावण सरींनी हिरवे कंच झालेल्या निसर्गसौंदर्याचा अनमोल नजराणा पाहाण्याची मजा काही औरच असते पृथ्वीवर सध्या निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली असून, हिरव्यागार वृक्षराईवर बहरलेल्या रंगीबिरंगी फुलावर पराग रसाची लज्जत चाखणारे सप्तरंगाने नटलेली विविध रंगाची फुलपाखरे निसर्ग सौंदर्यात भर टाकुन मन मोहून टाकत आहेत. फुलालाही लाजवेल अशी फूलपाखरांची सुंदर व एकापेक्षा एक मनमोहन छायाचित्र दिग्रसचे (जि. यवतमाळ) सकाळचे बातमीदार रामदास पद्मावार यांनी टिपली आहेत.

मधुमालतीच्या फुलातील परागरस चाखण्याकरीता चाललेली या सुंदर फुलपाखराची धडपड

निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या रंगानी नटलेले फुलपाखरू

मोगऱ्याच्या फुलाच्या सुगंधाचा मोहही या फुलपाखराला आवरता आला नाही.

पराग रसावर ताव मारताना

कोवळ्या पाणाची लज्जत चाखताना

पराग कणांचा शोध घेताना

फुलावर झेप घेताना

पराग रस चाखताना

फुलावर हक्क गाजवताना

कोवळ्या पानातील अंकुराची गुळचट लज्जत चाखताना
[pictures of beautiful butterflies ]

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...