मोतियांचे दाणे टिपणारे पक्षी

सकाळ वृत्तसेवा
पाऊस असतो...मनातला...वनातला...कधी रानातला....पाऊस असतो जीवनगाणे....पाऊसच गातो समृद्धीचे गाणे....! सगळीकडेच यंदा पावसानं पिंगा घातलाय. म्हणूनच की काय, कष्टाचा धनी शेतकरी हर्षोल्हासित होऊन आनंदाने नाचतो आहे. याच कष्टकरी शेतकऱ्याच्या श्रमाची समृद्धी शेताशेतात डोलू लागली आहे. ज्वारीचंही पिक मोतियांच्या दाण्यासारखं भरून आलंय. म्हणूनच की काय, पोपट-मैना,चिमण्या,कावळे व भवरे आपला वाटा वेचताहेत. दिग्रस (जिल्हा -यवतमाळ) येथील बातमीदार रामदास पद्मावार यांनी परीसरातील शेत शिवारातील ज्वारीच्या पीकातील कणसात भरलेल्या दुधाळ व गुळचट दाण्याची लज्जत चाखणाऱ्या पक्षांची टिपलेली छायाचित्रे

ज्वारीच्या कणसातील दुधाळ दाण्याची लज्जत चाखतांना पोपटांचा जोडा.

ज्वारीच्या कणसातील दाणे टिपताना मैना।

ज्वारीच्या कणसावर ताव मारताना पोपटाचा जोडा .

कणसातील दाणा चोचीत पकडून आपली भूक भागविण्याच्या धडपडीत भुकेने व्याकुळ मैना.

ज्वारीचे कणीस फस्त करताना भुंगे

पोट भरताच ज्वारीच्या दाण्याने भरलेली फांदी चोचीत धरून आपल्या पिलांचे पोट भरण्यासाठी उडालेला सप्तरंगी पोपट.

कणसातील दाणे टिपताना चिमण्या.

ज्वारीच्या कणसावर ताव मारताना कावळ्यांचा थवा.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...