‘स्वार्थी अशोक’ होणार पुण्यातून हद्दपार!

अभिजित घोरपडे (लोकसत्ता)
‘अशोकाचं स्वार्थी झाड’ स्वत:च्याच गुणवैशिष्टय़ांमुळे संकटात आले असून, या झाडाबद्दल ‘जिव्हाळा’ असलेल्या अजित पवार यांच्या पुण्यातून ते लवकरच हद्दपार होणार आहे. स्वत:पलीकडे इतरांना सावली न देण्याचा अवगुण आणि स्थानिकांना आकर्षित करून घेण्यास असमर्थ ठरल्याने अशोकावर ही वेळ आली आहे. त्यामुळे आगामी शरद’ ऋतूपासून हे झाड न लावण्याचा सल्ला पुणेकरांना देण्यात येणार आहे.
अशोकाचं झाड गेल्या काही आठवडय़ांपासून चर्चेत आहे. सहकारी पक्षांच्या मंत्र्यांच्या फायली दाबून ठेवल्यानेमंत्रिमंडळातील अनेक ‘हेवीवेट्स’ चा या झाडावर रोष होताच. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनीकाही दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळातील आपल्या नाराज सहकाऱ्यांच्या भावनांना वाट करून दिली, तीसुद्धा जाहीरकार्यक्रमात! ‘अशोकाचं झाड स्वार्थी’ असे वक्तव्य करून त्यांनी बार उडवून दिला. यावर संबंधित झाडाकडून कायप्रतिक्रिया काय येते, याची उत्सुकता असतानाच पवार यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेच्याक्षेत्रातून लवकरच अशोकाचे झाड हद्दपार केले जाणार आहे.
पुणे शहरात कोणती झाडे लावावीत, याबाबत महापालिकेच्या उद्यान विभागाकडून यादी जाहीर केली जाते. या यादीतील झाडे पुण्याच्या पर्यावरणासाठी योग्य असल्याने हीच झाडे नागरिकांनी लावावीत, असे आवाहन करण्यातयेते. याबाबत दोन याद्या गेल्या काही वर्षांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. आता ही यादी नव्याने सुधारित करण्यातयेत आहे. त्यासाठी प्रसिद्ध वनस्पतितज्ज्ञ डॉ. श्री. द. महाजन यांचा सल्ला घेण्यात आला आहे. महाजनसरांनीपुण्यात लावण्यासाठी सुचविलेल्या वृक्षांच्या यादीतून अशोक वगळण्यात आला आहे. त्याच्याबरोबर टबोबिया, सातवीन यांसारखी इतरही परदेशी झाडे यादीतून काढण्यात आली आहेत. ही सुधारित यादी वृक्षांच्या बोटॅनिकल नावांसह लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यातील झाडेच लावण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येणारआहे. त्यामुळे यापुढे अशोक लावू नका, असाच संदेश उद्यान विभागाकडून दिला जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही यादी जाहीर होणे अपेक्षित असल्याने आगामी ‘शरद’ ऋतूच्या आधीच पुण्यातून अशोकाची हद्दपारीपक्की झाली आहे.
हे झाड हद्दपार करताना वनस्पतितज्ज्ञांनीसुद्धा ते ‘स्वार्थी’ असल्याचे कारण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशोकाचे झाड पसरत नसल्याने त्याची सावली स्वत:वरच पडते. त्याचा इतरांना फायदा होत नाही. इतकेच नाहीतर अशोकाच्या झाडावर स्थानिक पक्षी किंवा कीटक आकर्षित होत नाहीत. पक्ष्यांना घरटे करण्यासाठीसुद्धा त्याचाउपयोग होत नाही. याशिवाय हे झाड मुळातच परदेशी आहे. हे निकष लावून अशोकाची हद्दपारी सुचविण्यात आलीआहे, असे कारण नवी यादी तयार करणाऱ्या वनस्पतितज्ज्ञांनी दिले आहे.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...