प्रतिसाद : तुझे पाप तुझ्याच पदरात

माणसाची प्रगती माणसाचे अस्तित्व राखण्यास असमर्थ आहे. माणूस निसर्गाचा एक भाग असल्याने निसर्गाच्याऱ्हासाने त्याच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे. शेती उत्पादन दरवर्षी घटत आहे. त्यामुळे माणसाच्या भुकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून माणसाला निसर्गाला कळवळा येत आहे. शेतीचा कस गेला, दरवर्षी उत्पन्नकमी कमी होत आहे. जंगले भकास झालीत. पशुपक्षांच्या काही जाती कायमच्या नष्ट झाल्या. पाऊस पडतो तेव्हा नद्यांना पूर येतात. पूर ओसरला की नद्या कोरडय़ा ठाक पडतात किंवा शहर कारखान्यांची गटारे म्हणून वाहतात.
जीवो जीवस्य जीवनम्या निसर्ग सत्याला समोर ठेवले की सर्व समस्या उघड होतात. पण आज त्या सोडवता येतनाहीत. निसर्गात अन्न सर्वाना खुले मुक्त असते. निर्मिती उघडय़ावर होते. रवा आणि मुक्त सचार करा. ‘जीवोजीवस्य जीवनम्नुसार सजीवच सजीवांचे अन्न आहे. सजीव सजीवांच्या पेशी भक्षण करून जगतात ही अन्नसाखळी म्हणजे फुड चेन आहे. ही अन्न साखळी सजीवांच्या दोन वासनावर आधारित आहे. एक वासना म्हणजे भूक दुसरी लैंगिक वासना. निसर्गाने या दोन्ही वासना अनावर बहाल केल्या आहेत. लैंगिक वासनेने वंश निर्मिती होते. या वंश निर्मितीतील काही भागाने (काहीकाळ) वंश सातत्य राखल्या जाते काही भागाने दुसऱ्याची भूक भागते.
अन्न चक्र त्यांच्या हद्दीतच फिरायला हवे. एका जंगलातले पशुपक्षी त्याच जंगलात जगायला मरायला हवेत, म्हणजेच ते जंगल सदैव समृद्ध असेल. जंगलातली वाळलेली लाकडे वाळवी गांडूळांनी खाऊन तेथेच मारावे खतम्हणून परत वनस्पतीस जगण्यास मदत करावी. जंगलातली लाकडे शहरात फर्निचर करीता नेली तर वाळवीभुकेने मरणार नंतर वनस्पतीला वाळवींचे कलेवर खत म्हणून मिळणार नाही म्हणून वनस्पतीही उगवणारनाही. माणसाला वाटेल जमिनीचा कस कमी झाला, हे पाप माणसाचेच आहे. वाळवीचे अन्न माणसाने स्वत:च्यासुखसोयीसाठी हिरावून घेतले. भारतामधल्या वनस्पती खाऊन, भारतामधले पाणी पिऊन निर्माण झालेले बोकड भारतातच मरायला हवे. बोकडाचे झाडाखाली दफन करा झाडाला मस्त बहर येतो. पण पेट्रोलसाठी हे बोकड हजारो मैल लांब वाळवंटात नेले तर भारतातील शेती निकस होणारच अबुधाबी किंवा मुंबईतील माणसांनी हे बोकड खाल्ले तर त्याच्या मलमुत्रातील पेशी शेतीत परत जाणार नाहीत. सेंद्रिय खत शेतीला मिळतच नाही. शेतात, जंगलात पशुपक्षी नाहीत पशुपक्षांचे मलमुत्र कलेवर शेतीस मिळत नाहीत. शेतीची मशागत टॅक्टरने होते. ९० टक्के लोक लहानमोठय़ा शहरात राहतात. शेतीतला सर्व माल शहरात जातो. शेतकरी, शेतमजूरही शेतात राहात नाहीत. ते बसने शेतात येतात. शहरातला कचरा ५० टक्के जाळल्या जातो. राखेत पेशी नसतात. राख कोणत्याही सजीवांचे अन्न नाही. राख जंतुनाशक आहे. म्हणून आपण दात घासायला, भांडी घासायला वापरतो. २५ टक्के कचरा पावसाबरोबर वाहून जातो. २५ टक्के कचऱ्याचे खत जवळपासच्या शेताला मलमुत्र आधुनिक ड्रेनेजने नदीनाल्यातून सरळ समुद्रात जाते. माणसाने मलमूत्रसोनखतसेंद्रिय खत आहे. ते शेतात परत जायला हवे. माणसाचे मृतदेहही खत आहे, तेही वनस्पतीला मिळायला हवेत. जाळल्या जाणारा सर्व कचरा गांडूळ, वाळवीचेअन्न आहे. कोणत्याही सजीवांचे अन्न जाळून नष्ट करणे पाप आहे.
सर्व सजीव भूतलावर मुक्त फिरत असतात. पशुपक्षी, किडे, सूक्ष्म जीवाणूचे कलेवर पेशी पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जावू नयेत. त्यांना ठिकठिकाणी अडकाव हवा. पशुपक्षांनी किडामुग्यांनी त्या भक्षण करून शेत जंगलात पडायला हव्यात. त्याकरिता भरगच्च झाडेवेली गवत हवे. खाच खळगे हवेत. नदीपात्रात वाहात जरी गेलेत तरी नदीतील मासे, खेकडे, बेडूक यांनी ते भक्षण करावेत, पशुपक्षांनी नदीतील मासे, बेडूक, खेकडे भक्षण करून मलमूत्र कलेवर द्वारे ते शेत जंगलात परत पडायला हवेत. कीटक नाशकामुळे पिकांना हानीकारक तसेच मित्र किडेही मेलेत, पशुपक्षी मेलेत, नदीनाल्यात वनस्पती नाही, कारखान्यातील रसायनामुळे नदी, नाले, गटार झालीत त्यात मासे, बेडुक, खेकडे नाहीत. त्यामुळे सर्व पेशी अन्न सरळ वाहत पावसाच्या पुराबरोबर समुद्रात जाते.
माणसाने खोल पातळातून पेट्रोल नावाचे नरक बाहेर काढले. हे नरक तो यंत्रांना पाजून माणूस जगभर फिरत आहे. या पेट्रोल नरकाने सर्व सजीवांची दाणादाण उडविली. त्याचे नाते तोडले, एकमेकांपासून हजारो मैल दूर दूर नेले. निसर्गाची अन्न साखळी तुटली. काही कडय़ाच नष्ट झाल्या कायमच्या काही कडय़ा दूरदूर भिरकावल्या. माणूसहाही या अन्न साखळीची एककडी आहे. ही स्वत:ची कडी तो इतर सजीवास मिळूच देत नाही, कारण तो पेट्रोलराक्षसावर स्वार आहे. ‘जीवो जीवस्य जीवनम्या निसर्ग नियमाला धरून माणसाची वर्तणूक नाही. त्यामुळे अन्नपाण्याचे संकट अटळ आहे. नैसर्गिक भूकेच्या वासनेसमोर माणसाची सुखसोयीची नशा गरकन उतरेल. माणूस निसर्गाकडे वळेल असे भविष्य तत्वज्ञ बटरड्र रसेल यांच्या फ्यूचर मॅनकाइंडंया निबधांत नमूद केलेआहे. निसर्ग माणसाचे पाप माणसाच्याच माथी मारेल.

सौजन्य : दैनिक लोकसत्ता
rticle by Mr. M.N. Balchaale, Aurangabad

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...