बहुमोल : मला पाहिजे होतं.

मुंबईतील अंधेरी पूर्व उपनगरातल्या बी. डी. सावंत मार्गाच्या दुतर्फा दाट झाडी होती. मुंबईबरोबरच इथलाही विकाससुरू झाला. काही वर्षांपूर्वी तिथे रस्तारुंदीकरण करण्यात आले आणि दोन्ही बाजूंच्या विशाल वृक्षांची तोड झाली. अस्सल भारतीय म्हणवले जाणारे कदंब, आंबा, चिंच, भेरली, माड, वड, पिंपळ, कडुिनब, बकुळ, आसुपालर अशाप्रकारचे अनेक वृक्ष गेले. या वृक्षांवर मोठय़ा संख्येने आश्रयाला असलेले पक्षी, कीटक इतर जीव बेघर झाले. काँक्रीटचे रुंद रस्ते तयार झाले. दोन्ही रस्त्यांच्या मधला साधारण दीड-दोन मीटर रुंदीचा मातीचा पट्टा यारस्तारुंदीकरणापासून वाचला होता. त्यामुळे या पट्टय़ातील वड, पिंपळ, सुरू, आसुपालर यांसारखी काही मोजकीचझाडे वाचली. या मधल्या मातीच्या पट्टय़ात आपल्या परीने झाडे लावायचे ठरविले. एका पावसाळय़ात पिंपळ, कदंब, वड, बदाम, जंगली बदाम, पांढरी सावर अशी झाडे लावली. ती वाढूही लागली, परंतु झाडांचा विचार करतोकोण? वाहतूक कोंडी झाली, की पुढे पळण्यासाठी या मधल्या पट्टय़ातून वाहने घुसवली जात आणि वाढतअसलेली रोपे मोडली, चिरडली जात. काही दिवसांनी मात्र दोन्ही बाजूला दीड-दोन फूट उंचीचे सिमेंटचे ठोकळेबसवण्यात आले आणि ही झाडे वाहनांपासून सुरक्षित झाली. हे करणाऱ्यांनी आतमध्ये काही शोभेची झाडे लावली. त्यांच्यासाठी दिले जाणारे पाणी मी लावलेल्या रोपांना मिळू लागले. कारण पूर्वी शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांतपाणी भरून या रोपांना पाणी घालायला जावे लागे.
पूर्वी मी एकटाच हे करायचो. नंतर श्री गणेश क्रीडा मंडळ या आमच्या गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनासहभागी करून घेतले. मिळेल तिथून झाडांच्या बिया-रोपे आणणे, त्यांची लागवड करणे, घरातील ओलाकचरा-गणेशोत्सवातील निर्माल्य यांपासून तयार केलेले खत वापरायचे, घरातीलच डाळ, तांदूळ, भाज्या धुतलेलेपाणी साठवून या रोपांना घालायचे, अशा प्रकारे एकही पैसा खर्च करता गेल्या काही वर्षांपासून आमचा हाउपक्रम सुरू आहे.
आजपर्यंत पिंपळ, जांभूळ, वड, पांढरी सावर, जंगली बदाम, बदाम, गुलमोहोर अशा प्रकारची १५ ते २० फूट उंचीचीझाडे उभी आहेत. काही झाडांच्या मुळाशी मधुमालतीची वेल लावून ती या झाडांच्या आधाराने वाढवली आहे. वृक्षारोपणासाठी झटणाऱ्यांचे श्रम वेळ वाचवण्याच्या दृष्टीने आणि परिसर झपाटय़ाने हिरवागार करण्याच्यादृष्टीने मोलाची ठरेल, अशी एक गोष्ट अनुभवाने माझ्या लक्षात आली. ती अशी, की फक्त बिया रुजवून रोपे तयारकरण्यात बराच कालावधी जातो. पुन्हा त्यांची जिवापाड काळजी घ्यावी लागते. परंतु वड, पिंपळ, उंबर हेपर्यावरणरक्षणाबाबत मोलाची भूमिका बजावणारे अस्सल भारतीय वृक्ष त्याचप्रमाणे जांभूळ, पेल्टोफोरम, पांढरीसावर यांसारख्या वृक्षांच्या बोटभर जाडीच्या पाच-सहा फूट लांबीच्या जून फांद्या छाटून ऐन पावसाळय़ात जरलावल्या, तर त्यांनाही छान फुटवे येतात, पालवी फुटते. ती बियांपासून तयार केलेल्या रोपांपेक्षा फार वेगानेवाढतात. परिणामी, वेळ, श्रम वाचतो.दरवर्षीलोकसत्तातर्फेगणेश दर्शनस्पर्धा आयोजित केली जाते. कदाचितआमच्या या विधायक सामाजिक कार्याची दखल घेत आमच्या मंडळाला चार वेळा कुलाबा ते दहिसर विभागातूनप्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सध्या कैलासपती, आंबा, बकुळ, बहावा, कदंब, जांभूळ अशा झाडांचीरोपे लागवडीसाठी तयार आहेत. अंधेरीतील एका महाविद्यालयाच्या परिसरातही आंबा, पांढरी सावर, फणस, पेल्टोफोरम, बदाम अशी मिळून १५ ते २० झाडे लावली आहेत.
या सगळय़ा झाडांच्या वाढीने आता रिते अवकाश हिरवाईने व्यापले जात आहे. त्यांच्या निवाऱ्याला पुन्हा पक्षी येतआहेत. पाना-फांद्यांवर कीटक, मुंग्यांची लगबग दिसत आहे. वसंताच्या आगमनाच्या वेळी पांढरी सावर फुलांनीबहरते. लाल-गुलाबी, किरमिजी रंगांच्या पालवीने पिंपळ लवलवतो. हे सर्व न्याहाळताना मन निसर्गाच्या सृजनसोहळय़ाच्या आनंदाने ओसंडून वाहते. परंतु या आनंदाला एक चिंतेची किनार असते. निसर्गाला ओरबाडूनत्याच्याकडून सर्व काही हिसकावून पुन्हा त्याला काहीच देणाऱ्या स्वार्थात माणसाने हळूहळू वाढत असलेल्या यावृक्षांवरच पुन्हा आपल्या विकासाचा वरवंटा फिरवला तर? कारण सुप्रसिद्ध कवी दिलीप चित्रे यांनी एका कवितेतम्हटल्याप्रमाणे- ‘मला पाहिजे होतं स्वत:भोवती दाट अरण्य आणि किडय़ामुंग्यांशी, पशुपक्ष्यांशी माणसांशी नाती!

सौजन्य : दैनिक लोकसत्ता
credit :This article is written by Mr। pravin shirgaonkar,Mumbai

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...