तिलारीचे सृष्टीसौंदर्य

सकाळ वृत्तसेवा
तिलारी, पश्‍चिम घाटात वसलेलं अतिशय रम्य ठिकाण. खळाळते झरे, वैविध्यपूर्ण निसर्ग, दुर्मिळ वनौषधी, थंडगार झोंबणारा वारा अन्‌ शुभ्र धुक्‍यात लपेटलेले धबधबे अनुभवायचे असतील तर तिलारीला जायलाच हवं... कोल्हापूर जिल्ह्यातला चंदगड हा शेवटचा तालुका. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर असलेला हा नेत्रसुखद परिसर अनेक वैशिष्ट्यांनी मनाला मोहिनी घालतो. आंबोलीपासून अवघ्या ६० किलोमीटरवर असल्याने तिलारी जाणकार पर्यटकांचं आकर्षण ठरला आहे. (सर्व छायाचित्रे - अरूण नाईक, कोल्हापूर)

मुख्य शहरांपासूनचे अंतर-
कोल्हापूर - तिलारी - १५० कि.मी.
पणजी - तिलारी - ६० कि.मी.










0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...