लावण्य मुक्तागिरीचे!

सकाळ वृत्तसेवा
निसर्गसौंदर्याचा अनमोल नजराणा पाहायचा असेल, तर मुक्तागिरीला आवश्‍य भेट द्या. भक्तीचा वारसा लाभलेल्या मुक्तागिरीवर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली असून, हिरव्यागार वृक्षराईच्या कुशीतील धबधबे मन मोहून टाकत आहेत. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले निसर्गाचे लावण्य सातपुडा पर्वतावर हिरव्यागार वृक्षवल्लीच्या कुशीत सामावले आहे. श्री दिगांबर जैन समाज बांधवांचे तीर्थ क्षेत्र असलेले मुक्तागिरी पावसाची संततधार सुरू झाली की, असे रम्य दिसते. खडकाळ पठारावरून कोसळणारा धबधबा निसर्गप्रेमी व पर्यटकांना खुनावतो. तर मंदिरामागून दोनशे पन्नास फुट उंचीवरून कोसळणारा धबधबा डोळ्याचे पारणे फेडतो. पायथ्याशी असलेला धबधबा भक्तांसह पर्यटकांचेही स्वागत करतो. दिग्रसचे (जि. यवतमाळ) रामदास पद्मावार यांनी टिपलेली इथली एकापेक्षा एक मनमोहन छायाचित्रे.

मुक्तागिरीच्या पायथ्यापाशी उंच पर्वतावरून कोसळणारा धबधबा.

मुक्तागिरीच्या पायथ्याशी कोसळणारा धबधबा भक्तांसह निसर्गप्रेमी व पर्यटकांचे स्वागत करतोय।

पर्वताच्या शिखरावरून दोनशे पन्नास फुट खाली धो-धो करीत कोसळणाऱ्या मुक्तागिरीच्या मंदिरामागील मुख्य धबधब्याचे विहंगम दृश्‍य.

पर्वताच्या शिखरावरून दोनशे पन्नास फुट खाली धो-धो करीत कोसळणाऱ्या मुक्तागिरीच्या मुख्य धबधब्याचे झाडा मागून टिपलेले विहंगम दृश्‍य.
पर्वताच्या शिखरावरून खडकावरून खळखळणारे पाणी व पाऊससरींनी हिरव्याकंच वृक्षांनी बहरलेल्या निसर्गाच्या सौंदर्यात छायाचित्र काढण्यात बेधुंद झालेली तरूणाई.

मुक्तागिरी पर्वताच्या शिखरावरून पर्वताच्या सानिध्यात वसलेल्या जैन बांधवांच्या मंदिराचे व पर्वताच्या मधून पायथ्यापासून वाहणाऱ्या ओढ्याचे विहंगम दृश्‍य.

मंदिर परिसरात असे अनेक छोटेमोठे धबधबे पाहावयास मिळतात .

मंदिरामागून कोसळणारा धबधबा मंदिराच्या सौंदर्यात भर टाकत आहे.

निसर्गाचे देखणे रूप पाहण्यासाठी निसर्गप्रेमी व पर्यटक गर्दी करीत आहेत.

पर्वतावरून जलद गतीने कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचे टिपलेले दृश्‍य.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...