विनोद कामतकर - सकाळ वृत्तसेवा
सोलापूर - वर्षभर सहसा न आढळणारे बेडकांच्या पावसाळ्यात असंख्य जाती, प्रजाती आढळतात. टणा टण उड्या मारत फिरणारी अनेक बेडकं इतर ऋतूमध्ये स्वताःमध्ये बदल करून निष्क्रीय होऊन दडून बसतात. पिकांवरील इतरत्र आढणाऱ्या आळ्या, किडे खाऊन बेडूक निसर्गाचा समतोल राखतात, अशी माहिती येथील अभ्यासक आदित्य क्षीरसागर यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.
श्री. क्षीरसागर म्हणाले,""निसर्ग एक अफाट विविधतेने नटलेल्या अश्चर्यांचा खजिना. याच निसर्गाची अनेक सुंदर रुपे नजरेस पडतात. अल्हाददायी पावसळ्याची मजा सर्वच प्राणी लुटततात. त्यादरम्यान आणखी एक आश्चर्यकारक आणि सुंदर जीव जमीनीवर प्रकटतो तो म्हणजे बेडूक.''
सोलापूर शहर व जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आढळणाऱ्या बेडकांचा अभ्यास आम्ही करतोय. उभयचर वर्गात मोडणारा एक थंडरक्ताच्या या जीवाची उत्पती सुमारे 40 कोटी वर्षांपूर्वी झाली. विविध आकार, रंग आणि तऱ्हे तऱ्हेच्या नक्षी असणाऱ्या या बेडकांच्या जगभरात सहा हजार जाती सापडतात. आणखी नवनवीन जातींचा शोध लागतोय. पण, प्राणी नेमका पावसाळ्यात कसा सक्रीय होतो? मग इतरवेळी कुठे गायक होतो? यावर अभ्यास सुरू आहेत.'' पावसाळ्यात हवेत असणारी आर्द्रता, ओलावा जी बेडकांना जीवंत राहण्यास मदत करते. बेडकाला जीवंत राहण्यासाठी त्याची त्वचा ओली राहणे आवश्यक असते. इतर ऋतूत त्यांचा ओलावा टिकून राहण्यासाठी ते सोयीस्कर ठिकाणी तेवढ्या कालावधीपुरते निष्क्रीय होऊन दडून बसतात. बेडकांचा रंग तापमान आणि आर्द्र्रतेवर अवलंबून असतो. तापमान कमी व आर्द्रता जास्त असते तेव्हा त्यांचा रंग गडद असते तर कोरड्या उष्ण वातावरणात तो फिकट होतो. आर्द्रता, तापमान आणि पाणी या बेडकाच्या मुलभूत गरजा आहेत.
जमिनीवर, पाण्यावर, जमिनीखाली, झाडावर राहणाऱ्या बेडकांचे दोन मूळ प्रकार आहेत. खरबरीत त्वचेचा टोड आणि दुसरा प्रकार मऊ, ओलसर त्वचेचा फ्रॉग.
जगातील सर्वात छोटा बेडूक फक्त एक सेटींमीटर लांबीचा असून तो फक्त आपल्या नखावर सुद्ध चक्क आरामशीर बसू शकेल. "गोलीयाथ फ्रॉग" हा जगातील सर्वात मोठा बेडूक आहे. बेडकाची त्वचा त्याच्यासाठी बहुउपयोगी आहे. श्वासोच्छावास व ओलावा टिकून ठेवण्यात मदत करते. त्वचेवरील विशेष प्रकारची रसायने त्यांना राहण्याची योग्य ठिकाणची निवड करण्यासही मदत करते. बेडकांना शिकार करण्यास व त्यांच्यापासून लपण्यासही मदत करते. काही बेडकांच्या त्वचेवर विषारी रसायने स्त्रवत असल्याने बेडकांचे शिकाऱ्यांपासून संरक्षण होते.
झाड बेडकांचे पाय झाडावर चढणे व चिकटण्यासाठी विकसीत झाले. मलबारी उडणाऱ्या बेडकांच्या पायांना हवेत तरंगण्यासाठी पडदे विकसीत झाले. जमीन खोदणाऱ्या बेडकांसाठी त्यास अनुकूल पाय विकसीत झाले.''
पावसाळा बेडकांना पाहण्याचा, अनुभवणे, अभ्यासण्याचा ऋतू आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाला त्याची भूमिका वाटून दिली आहे. त्यातून तर निसर्गाचा इतका किचकट कारभार सुरळीत पार पडतोय. निसर्ग साखळीत किटकांची संख्या नियंत्रीत करणे व स्वताः साप शिकारी, पक्षी इत्यादींना खाद्य म्हणून उपलब्ध होणे या भूमिका बेडूक पार पाडतात. जमीनीवर वाढणारी बुरशी बेडकांचा प्रमुख शत्रू आहे. बरुशीमुळे बेडकांचा त्वचे मार्फत होणारा श्वासोच्छास बंद पडतो. गुदमरून त्यांचा मृत्यू ओढावतो.पिकांवरील इतरत्र आढणाऱ्या आळ्या, किडे खाऊन बेडूक निसर्गाचा समतोल राखतात.''
निसर्गसमतोल राखण्यात बेडकांचे योगदान
Posted by Pravin at 5:07 PM
Labels: nature, species of frog
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 Comments:
Post a Comment