प्रकाश ठोसरे(संचालक, सामाजिक वनीकरण)
वाघाने मला अनेकवेळा पाहिले. पण, वाघाच्या निकट सान्निध्यात वारंवार येऊनही मला त्याचे ओझरते दर्शनही घडले नाही. अनेकदा वाघाने मला चकवले! या चकवा-चकवीची ही चित्तरकथा..
वर्ष १९९२ चे १ एप्रिल ‘सर्व मूर्खाचा दिवस’ मला अद्यापही चांगला स्मरतो. भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनचे तत्कालीन संचालक एच.एस. पवार आपल्या संस्थेतील ३० तरुण प्रशिक्षणार्थीच्या चमूसह मेळघाट अभ्यास दौऱ्यावर आले होते. सकाळच्या सत्रात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व्यवस्थापन विषयक कामाची माहिती देण्यासाठी त्यांच्यासमवेत मी सहभागी झालो होतो. फिरस्तीच्या अंतिम टप्प्यात मी स्वत: होऊनच किंचीत बदल करून वेगळी वाट धरली. या बदलाचे दृश्यफळ मला तात्काळ मिळाले. एक भव्य नरसांबर व त्यांच्या समवेत दोन सांबार मादी, पाठीवर बसलेल्या नवजात पिलासह मार्गक्रमण करणारी अस्वलमादी, माझ्या डाव्या खांद्यावरून उडत गेलेला तुरेवाला सर्प गरुड यांचे दर्शन मला झाले. त्यावेळी माझ्यासोबत नसलेले प्रशिक्षणार्थी या वन्यप्रश्नणी दर्शनाला मुकल्याबद्दल मला खूप वाईट वाटले. त्या दिवशी संध्याकाळी विश्रामगृहावर सर्वजण एकत्र जमताच मला झालेल्या दुर्लभ प्रश्नणीदर्शनाची त्यांना माहिती देण्यासाठी मी उतावीळ झालो होतो. माझ्या कथनाचा त्यांच्यावर काही परिणाम न होता उलट प्रशिक्षणार्थी विस्फारलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहू लागताच माझ्याकडून मार्ग बदलाने घडलेली चूक मला उमगली. माझ्या पश्चात त्या दिवशी त्यांना भर दुपारी १२ वाजता नदीच्या कोरडय़ा पात्रात बसलेल्या वाघिणीचे दर्शन झाले होते. मी मात्र कोरडा राहिलो.
‘गव्याच्या शिकारी’च्या मचाणावर:
थंडीचे दिवस होते. एके दिवशी बिनतारी संदेश मिळाला की, आदल्या रात्री एका ६०० किलो वजनाच्या प्रचंड गव्याची वाघाने शिकार केली आहे. या संदेशाला प्रत्युत्तर म्हणून वाघाने गवा मारलेल्या स्थळाजवळ, वाघास न दिसेल व संशय येणार नाही अशा पद्धतीने मचाण बांधण्यासाठी मी सूचना दिल्या व नंतर संध्याकाळी मचाणावर चढून वाघ पाहण्यासाठी आतुरतेने निस्तब्ध बसून राहिलो. व्याघ्रदर्शनाचा ध्यास मनात असल्याने, गव्याच्या मृतदेहाला कुरतडणारे मुंगूस, टक्काचोर (ट्री पाय) पक्ष्याच्या जोडीने मृतदेहाला टोच मारून मांसाचा तुकडा चोरण्याचा केलेला प्रयत्न, नजीकच्या पाणस्थळावर भयग्रस्त भेकराने केलेले जीवघेणे पलायन यासारख्या दुर्मिळ वन्यजीव निरीक्षणाचे क्षणाकडे आमचे दुर्लक्ष झाले. वाघाच्या आगमनाची व दर्शनाची तणावपूर्ण उत्कंठा होती. पण, खूप प्रतीक्षेनंतर अंधार पडल्यानंतर निराश होऊन आम्ही व्याघ्रदर्शनाची आशा सोडून दिली व मचाणावरून उतरून मृत गव्याजवळच्या मार्गाचे निरीक्षण केले असता वाघ आल्याचे व तेथून निघून गेल्याचे स्पष्ट झाले. रात्री आम्ही त्या ठिकाणाहून निघून गेल्यावर वाघ पुन्हा आला व त्याने शिकारीवर चांगला ताव मारला, असे दुसऱ्या दिवशी समजले. त्या दिवशीही व्याघ्रदर्शन माझ्या नशिबात नव्हते हेच खरे. वाघाने मात्र निश्चितपणे आम्हाला पुन्हा पाहिले होते!
नदीपात्रातील हुलकावणी:
एके दिवशी मेळघाट वनातील अतिसंरक्षित क्षेत्रात नेहमीप्रमाणे पायी गस्त करीत असताना स्थानिक आदिवासी सुरजपाल आमचे नेतृत्व करीत होता. सुरजपाल यास निसर्गाच्या गुढतेचे सखोल व उत्तम ज्ञान आहे. आम्ही वाटचाल करत असलेला रस्ता हंगामी स्वरूपाचा असून रस्त्यास २०० मी. अंतरावर समांतर नदीचा प्रवाह आहे. नदी व रस्ता यामधील पट्टय़ात घनदाट झाडी आहे. सकाळची ९ वाजण्याची वेळ असावी. रस्त्याच्या मऊ मातीत वाघाच्या पावलांचे ताजे ठसे दिसून आले. ते किती ताजे असावेत याची चर्चा चालू असतानाच अचानक वानराने दिलेल्या धोक्याच्या सूचनेच्या पाठोपाठ नदीच्या बाजूने वाघाने दिलेली मोठी डरकाळी कानी पडली. सुरजपाल क्षणार्धात विजेच्या चपळाईने एका उंच झाडावर चढला व नदीच्या कोरडय़ा पात्रातील वाघाच्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागला. सुरजपाल अतिशय उत्तेजित झाला होता. नदी पात्रात एक मोठा वाघ असल्याचे खुणेने व दबक्या आवाजात सांगत तो झाडावरून तात्काळ खाली उतरला. काही क्षणातच आम्ही दाट झाडोरा पार करून नदीपात्राच्या किनारी आलो व उत्तेजित होऊन वाघाचा शोध घेऊ लागलो परंतु, वाघ जादू केल्यागत अचानक अदृश्य झाला व आम्ही केवळ नदीचे मोकळे पात्र पाहत राहिलो.
स्वेटरने केला घात!
मेळघाट वास्तव्यात नोव्हेंबर महिन्यातील थंडीच्या मोसमात एका संध्याकाळी मी खटकाली ते धारगड दरम्यान मिनीबसमधून व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांसमवेत प्रवास करीत होतो. हवेत चांगला गारठा होता. प्रवासात समोर येणाऱ्या वन्यप्रश्नण्यांचे प्रथम दर्शन व्हावे म्हणून सर्वाचा वरिष्ठ अधिकारी असल्याने अधिकार गाजवून मी सवरेत्कृष्ट स्थानावर बसलो होतो. प्रवासादरम्यान प्रथम २० रानडुकरांचा कळप रस्ता ओलांडताना दिसला. त्यानंतर राखी रानकोंबडय़ांची जोडी रस्त्याच्या कडेने जंगलात पळताना दिसली. व त्यानंतर रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या आकर्षक मोराचे दर्शन झाल्याचे मला स्मरते. आता सुळईनाल्याच्या पात्रात व्याघ्र दर्शनाची शक्यता असल्याने सर्वजण अधिकच सावध झालो. अचानक मला नव्या बंदगळ्याच्या (पोलोनेक) स्वेटरमुळे गरम होऊ लागल्याने तो स्वेटर मी डोक्यातून ओढून काढू लागलो. याच क्षणी वाहन चालकाने रस्त्यावर वाघ असल्याचे हलक्या आवाजात सांगितले. मी घाईने अंगातील स्वेटर तात्काळ डोक्यावरून फाडून काढण्याचा प्रयत्न केला. स्वेटर निघाल्यावर मी पाहिलं तर वाघ गायब! मिनीबसमधील, मी सोडून इतर आठ जणांनी वाघाचे दर्शन घेतले!
पिंजऱ्यातील नजरकैद:
एकदा हरिसाल गावाजवळील वनात पिलांसह असणाऱ्या वाघिणीने गव्याची शिकार केली. (पिलांसह वाघीण म्हणजे अत्यंत धोकादायक!) व्याघ्र निरीक्षणासाठी यावेळी नेहमीपेक्षा वेगळी व्यवस्था करण्यात आली. शिकार झालेल्या गव्यापासून अंदाजे २० मीटर अंतरावर एक जुना व मोडकळीस आलेला (जाळीचा, कोंबडय़ा ठेवण्यासाठी वापरावयाचा) पिंजरा ठेवून तो सर्व बाजूंनी झुडपांच्या फांद्यांनी आच्छादित करण्यात आला होता. दोघांची जोडी तिघांच्या गर्दीपेक्षा बरी, या म्हणीनुसार मी व फक्त माझा मित्र अनंत या दोघांनी पिंजऱ्यात बंदिस्त होऊन व्याघ्र दर्शन घ्यायचे व कुटुंबीयांनी शिकार स्थळापासून अंदाजे एक कि.मी. अंतरावर उभ्या केलेल्या कारमध्ये बसून राहायचे, असे ठरविण्यात आले. उशिरा संध्याकाळी, रस्त्यापासून पिंजऱ्यापर्यंत उंच गवतातून (पावलोपावली गवतात वाघ दडलेला असल्याची भीती मनात घेऊन) ठेचकाळत आम्ही पिंजऱ्यापर्यंत पोहचताना वाटेत १०/१२ जंगली लावऱ्याचा कळप फडफडत भुर्रकन उडत गेल्याचा अत्यंत घाबरवणारा आवाज झाल्याचे आजही मला स्मरते. आम्ही दोघांनी पिंजऱ्यात प्रवेश केल्यावर पिंजरा बंद करून सोबत आलेले साथी शुभेच्छा देऊन निघून गेले. पिंजऱ्यातून आम्ही निस्तब्ध होऊन मृत रानगव्यावर ताव मारण्यासाठी येणाऱ्या वाघिणीची प्रतीक्षा करू लागलो. ती मिट्ट काळोखी रात्र होती. सर्वत्र निरव शांतता होती. खिशातून पानपरागची पुडी अलगद काढण्याचा माझ्या स्नेहाने केलेला प्रयत्न, त्या निस्तब्ध अंधाऱ्या रात्रीत बाँब स्फोटासारखा खूप मोठा आवाज करत असल्याचे निदर्शनास येताच त्याने सोडून दिला. अनंतला आम्हा दोघांसमवेत पिंजऱ्यात साप असल्याचा भास होऊ लागल्याने तो जास्तच अस्वस्थ झाला. अचानक सांबराचा धोक्याच्या वेळी निघणारा स्वर कानी आला व वाघीण शिकारीवर येण्यास मार्गस्थ असल्याची आमची खात्री झाली. सर्वप्रथम हाडे फोडल्याचा व तोंडात घेऊन चघळण्याचा आवाज आला. पाच मिनिटाच्या आत आमच्या आजूबाजूस हालचाल होत असल्याचे व पिंजऱ्यातून केवळ काही अंतरावरच जनावरांच्या श्वासोच्छवासाची स्पंदने व मांसभक्षक प्रश्नण्यांचा तीव्र वास येऊ लागला. वाघीण पिंजऱ्यातील आम्हा द्विपादाचे निरीक्षण करत असावी हे स्पष्ट झाले. अनंत तर भीतीने गारठून गेला. मी मात्र घामाघूम झालो. इतके होऊनही वाघिणीचे दर्शन नाही. अशा स्थितीत २० मिनिटाहून अधिक वेळ आम्ही प्रतीक्षेत घालविला. हतबल होऊन जनावर दूर जावे यासाठी घसा फोडून मोठा आवाज करीत, आम्हाला परत नेण्यासाठी ठरल्या वेळेस नेणाऱ्या मंडळीच्या उपस्थितीत, पिंजऱ्याबाहेर पडलो व खाली मान घालून जीपकडे येण्यास निघालो. जीपने हरिसालकडे जाणारा रस्ता पकडला. १० मिनिटानंतर आमच्या जीपमागे माझी कार निघाली. कार मधील कुटुंबीय आनंदाने चित्कारत होते. त्या दहा मिनिटातच मोटारकारमध्ये बसूनच त्यांनी निवांतपणे गाडीच्या प्रखर झोतात ‘ती वाघीण’ व तिची ३ पिल्ले पाहिली होती!
वाघ जवळपास असूनही दृष्टीस न पडण्याचे माझे रुसलेले नशीब अखेरीस प्रसन्न झाले व उर्वरित अडीच वर्षाच्या कालावधीत मला १४ वेळा वाघ पाहण्याचे भाग्य लाभले.
मेळघाटास भेट देणाऱ्या निसर्गप्रेमींना आवाहन आहे की, त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पास भेट देताना केवळ व्याघ्र दर्शनाची अभिलाषा मनात ठेवू नये व वाघ न दिसल्यास निराश होऊ नये. मेळघाटात सहजासहजी वाघ दिसला असता तर मानवाने तो कधीच संपविला असता हे लक्षात घ्यावे. मेळघाटमध्ये जैवविविधता, निसर्गाने मनापासून केलेली विविधरंगी चित्ताकर्षक उधळण, उडती खार, तुरेवाला सर्पगरूडाचे घरटे, अगदी सायाळीचे घरटे देखील आपल्याला व्याघ्र दर्शनाचा आनंद मिळवून देऊ शकते. निसर्गाचे विविध आविष्कार पाहून आपण त्यांचे मन:पूर्वक कौतुक केले पाहिजे. व्याघ्र दर्शन झालेच तर नशिबाने खूप साथ दिली असे मानावे!
Article citation: http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=23591:2009-11-14-15-43-02&catid=97:2009-08-04-09-03-27&Itemid=109

0 Comments:
Post a Comment