वन्य्रप्राण्यांवर प्रेम करणारांना वाईट वाटेल अशी ही बातमी आहे. एका अधिकृत सर्व्हेनुसार भारतात आता फ़क्त१५०० वाघ उरलेत. २००१-०२ मध्ये झालेल्या सर्व्हेनुसार भारतात वाघांची संख्या ३६५२ होती आणि जर अशाचवेगाने वाघ कमी व्हायला लागले तर एक दिवस म्युझियम मध्ये वाघांची कातडी पाहूनच समाधान मानावे लागेल. स्टँटस ऑफ टायगर्स, कोप्रीडेटर्स अँड प्रे इन इंडिया नावाचा हा सर्व्हे डेहराडूनच्या national tiger conservation authority ने केला आहे.
- वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण वाघांची शिकार आणि जंगलतोड़ हे आहे.
-१०० वर्षांपूर्वी वाघांची संख्या ४०००० होती.
-गेल्या सहा वर्षांत ती ६०% नी कमी झालेली आहे.
रिपोर्टनुसार वाघांच्या संख्येची चार भागांत विभागणी करण्यात आलेली आहे.
- शिवालिक गंगा क्षेत्र (उत्तराखंड, उ.प्र., बिहार) यात २९७ वाघ (सर्वाधिक उत्तराखंड - १७८ )
- मध्यभारत क्षेत्र (आंध्रप्रदेश, छत्तीसगढ़, म.प्र., महाराष्ट्र, उड़ीसा, राजस्थान और झारखंड) यात ६०१ वाघसर्वाधिक मध्यप्रदेश- ३००) (
- पश्चिम घाट क्षेत्र (केरळ, कर्नाटक, तमिळनाडू) यात ४०२ वाघ (सर्वाधिक कर्नाटक- २९०)
- उत्तर-पूर्व (असम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, पश्चिम बंगाल) यात २०० वाघ
शास्रीय पध्दतीची आकडेवारी
सर्व्हे चालू असताना झारखंड आणि सुंदरबन इथल्या वाघांची संख्या राज्याच्या प्रोटोकाल नुसार दिली गेली नाही.वाघांची संख्या आतापर्यंत पंजांचे ठसे ओळखणारया तज्ज्ञांच्या मदतीने मोजली जायची. या सर्व्हेत विशेष शास्रीयपध्दतीने आकडेवारी गोळा करण्यात आलेली आहे. वाघांची गणना खास जीपीएस सिस्टीम, ग्राफिकल इन्फोर्मेशनसिस्टीम, कँमेरा, मॉनिटर यांच्या मदतीने करण्यात आली आहे.
0 Comments:
Post a Comment