कासवांची 366 पिल्ले समुद्राच्या कुशीत

चिपळूण - वेळास (ता. मंडणगड) येथे सुरु  असलेल्या कासव महोत्सवात कासवांच्या घरट्यांमधून यावर्षी 366 पिल्ले सोडण्यात आली. आत्तापर्यंत 550 पर्यटकांनी कासव संवर्धन प्रकल्पाला भेट दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग, वनविभाग, सह्याद्री निसर्ग मित्र संस्था, वेळास ग्रामपंचायत व कासव मित्रमंडळ वेळास यांच्या संयुक्त विद्यमाने 19 फेब्रुवारीपासून कासव महोत्सव सुरू करण्यात आला आहे. महोत्सवाला सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे सचिव भाऊ काटदरे, उपविभागीय वनाधिकारी रणजितसिंह राणे, अशोक लाड, मंडणगड तालुक्‍याचे तहसीलदार सौ. सर्जेराव मस्के पाटील, मंडळ अधिकारी एस. डी. गावडे, तलाठी अनिल माने, वेळासचे सरपंच सौ. दिप्ती पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील, किशोर सावंत, सौ. शुभांगी पाटील, राजा उपाध्ये आदी उपस्थित होते. उपक्रमासाठी रियाली एक्‍स्पेडीशनचे आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक उपस्थित असून त्यांनी सागरी कासव संवर्धन प्रकल्पाला हातभार लावला आहे. याबाबत माहिती देताना सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे सचिव भाऊ काटदरे म्हणाले, '2002 मध्ये वेळास गावात सागरी कासवांची वीण आढळली. घरट्यांना माणूस व कुत्रे, कोल्ह्यांपासून सुरक्षित करण्यासाठी किनाऱ्यावर हॅचरी उभारण्यात आली आहेत.'' 

बातमी:सकाळ

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...