सर्पमित्राकडून शिंगी घुबडाला जीवनदान

सौजन्य : सकाळ वृत्तसेवा
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील स्टेट बॅंक ऑफ हैदराबादच्या समोर शनिवारी (ता. 11) संध्याकाळी जखमी अवस्थेतील शिंगी घुबड सापडले. सर्पमित्र संघानंद शिंदे यांनी त्याला रात्रभर सांभाळले. त्याच्यावर उपचार करून नंतर त्याला सोडून देण्यात येईल, असे त्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

चिकलठाणा एमआयडीसीतील कंपनीतून घरी जाणाऱ्या कडूबा बोर्डे आणि कचरू जाधव यांनी स्टेट बॅंक ऑफ हैदराबादच्या समोर जखमी अवस्थेतील शिंगी घुबड पाहिले. त्यांनी अशोकनगर परीसरातील सर्पमित्र संघानंद शिंदे यांना त्याची माहिती दिली. शनिवारी (ता. 11) रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या घुबडाला ताब्यात घेतले. स्वतंत्र व्यवस्था करून त्यांनी ते रात्रभर स्वतःच्या घरात व्यवस्थित ठेवले. त्याची माहिती रात्रीच वन खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी त्याच्यावर उपचार करून घेण्याचा सल्ला दिला. पण सलगच्या सुट्ट्यांमुळे खडकेश्वरचे पशुसंवर्धन रूग्णालय बंद असल्याने त्यांनी सोमवारी (ता. 13) या रूग्णालयात नेऊन उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यावर सध्या घरगुती इलाज सुरू आहेत.

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात जखमी अवस्थेत आढळलेले शिंगी घुबड.
या शिंगी घुबडांची नजर अतिशय करारी असते.या शिंगी घुबडाच्या उजव्या पंखाला मार लागला आहे. त्यामुळे ते रस्त्याच्या कडेला उभे होते .

शासनमान्य सर्पमित्र संघानंद शिंदे यांनी जीवनदान देऊन त्याच्यावर उपचारही सुरू केले आहेत.

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...