गिधाडांच्या ‘कॅप्टिव्ह ब्रिडींग’चा देशातील पहिला प्रयोग यशस्वी

महाराष्ट्राच्या सचिन रानडेचा सिंहाचा वाटा

From millions of individuals in the 1980s, vultures have simply disappeared from large swathes of India, Pakistan and Nepal. Photo credit Guy Shorrock (rspb-images.com).

 गिधाडांच्या ‘कॅप्टिव्ह ब्रिडींग’चा (बंदिस्त प्रजजन) देशातील पहिला प्रयोग आसामातील गिधाड संवर्धन केंद्रात यशस्वी झाला असून यात सचिन रानडे या मराठी पर्यावरणतज्ज्ञाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गुवाहाटीपासून ४० किमी अंतरावर असलेल्या रानी येथील गिधाड संवर्धन केंद्रात पांढऱ्या पोटाचे गिधाड आणि चपटय़ा चोचीचे गिधाड या दोन प्रजातींनी झाडांवर घरटी बांधून त्यात अंडी दिल्यानंतर त्यांची पिल्ले आता चार महिन्यांची झाली आहेत.
त्यांची प्रकृती अत्यंत उत्तम आहे, अशी माहिती आसामचे प्रधान वनसंरक्षक (वन्यजीव) सुरेश चांद यांनी दिली.
गिधाडांच्या या दोन्ही प्रजाती नामशेषाच्या मार्गावर असून देशभरात अवघी १ हजार गिधाडे शिल्लक आहेत. या प्रयोगाने गिधाड संवर्धनाच्या प्रयत्नांना नवे बळ दिले आहे. हिमाचल ते आसाम या भागात पूर्वीच्या काळी गिधाडांचे मोठय़ा संख्येने अस्तित्व होते. यात चपटय़ा चोचीच्या गिधाडांची संख्या भरपूर प्रमाणात होती. गेल्या दहा वर्षांत नावालाही गिधाडे दिसून येत नाहीत. त्यामुळे गुवाहाटीनजीक गिधाड संवर्धन केंद्रात बंदिस्त प्रजननाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि आसाम वन विभागाने २००७ साली हा प्रकल्प हाती घेतला. याची फळे पाच वर्षांनंतर दिसू लागली आहेत. या केंद्रात प्रायोगित तत्त्वावर गेल्या पाच वर्षांपासून २५ पांढऱ्या पोटाची आणि २२ चपटय़ा चोचीची गिधाडे ठेवण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश गिधाडे बाल्यावस्थेतच येथे आणण्यात आली आहेत. बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेकडे जाण्यासाठी गिधाडांना किमान पाच वर्षांचा कालावधी लागतो. यानंतर ते प्रजननासाठी सक्षम होतात. या प्रजनन केंद्रात नैसर्गिक वातावरणाची निर्मिती करण्यात आली असून डायक्लोफेनॅक मुक्त जनावरांचे मांस या गिधाडांना दिले जात आहे. येत्या काही वर्षांत या केंद्रातून १०० गिधाडे देशभरात सोडण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
प्रकल्पाचे व्यवस्थापक सचिन रानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रयोग यशस्वी झाल्याने गिधाड संवर्धनाचे महत्त्व लोकांना पटू लागल्याचे सिद्ध झाले असून निसर्गाच्या साखळीतील गिधाडांची भूमिका लक्षात घेऊन जनजागृती केल्यास ही प्रजाती वाचविता येऊ शकेल. गिधाडांच्या प्रजननासाठी त्यांच्या खाण्यापिण्याची योग्य काळजी घेतली गेल्यानेच हा प्रयोग यशस्वी झाल्याचे सचिन रानडे यांनी सांगितले. शिकारी पक्षी निसर्ग स्वच्छतेत मोलाची भूमिका बजावत आहेत. या पक्ष्यांची अन्न पचविण्याची क्षमता अफाट असते. गिधाडांची प्रजाती मेलेल्या जनावरांचे मांस भक्षण करून जगते. त्यामुळे त्यांच्या आतडय़ांमध्ये निसर्गदत्त अशी पचनक्षमता आहे. सडलेले मांस किंवा अ‍ॅन्थ्रेक्स, रॅबिज झालेल्या जनावरांचे मांस खाल्ल्यानंतरही गिधाडांना कोणताही संसर्ग होत नाही. उलट या रोगांचा संसर्ग रोखण्यात गिधाडांची मदत होते. गेल्या दोन दशकांपासून डायक्लोफेनॅक या वेदनाशामक औषधावर बंदी आहे. पाळीव जनावरांना देण्यात येणाऱ्या या औषधाने गिधाडांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आली आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर दि कन्झव्‍‌र्हेशन ऑफ नेचरने (IUCN)गिधाडांची प्रजाती दुर्मिळ पक्ष्यांच्या यादीत समाविष्ट केली आहे. गेल्या दोन दशकात ९९ टक्के गिधाडे नष्ट झाल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे. 


 -लोकसत्ता प्रतिनिधी , नागपूर

 November 2009. For every 1000 Oriental white-backed vultures occurring in southern Asia in the 1980s only one remains today because of the lethal effects of diclofenac - a drug used to treat livestock - on vultures. Alarmingly, researchers looking into safe alternatives have now identified that a second, livestock treatment in Asia - ketoprofen - is also lethal to the birds. Vultures feeding on the carcasses of recently-treated livestock suffer acute kidney failure within days of exposure-From wildlifeextra

0 Comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...