साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास करून शहरात आगमन
लोकसत्ता प्रतिनिधी, नागपूर, सोमवार, १३ फेब्रुवारी २०१२
‘बार हेडेड गुज’ (पट्टकादंब हंस) हे कॉलर केलेले दोन मंगोलियन पक्षी साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास करून नागपुरात आले असून, पक्षिमित्र सुरेंद्र अग्निहोत्री व तरुण बालपांडे यांना उमरेडजवळील पारडगाव तलावावर पक्षीनिरीक्षणादरम्यान ते आढळून आले.
के-६० व एक्स-९७ हे दुसऱ्या टप्प्यातील ग्रीन कॉलर केलेले पट्टकादंब हंस आहेत. या दोन्ही पक्ष्यांविषयीची माहिती मंगोलियन पक्षीतज्ज्ञ न्याम्बयार आणि मार्टिन गिल्बर्ट यांना कळविण्यात आली आहे. सलग चार-पाच वर्षांपासून या एकाच ठिकाणी कॉलर केलेले पट्टकादंब हंस येत आहेत आणि अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे पक्षितज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वाईल्डलाईफ सायन्स अँड कन्झर्वेशन सोसायटी व मंगोलियन अकादमी ऑफ सायन्स या दोन्ही संस्थांनी ‘मायग्रेशन पॅटर्न स्टडी’साठी २००६ मध्ये ३९८ पट्टकादंब हंस आणि इतर पाणथळ पक्ष्यांना कॉलर केले होते. २०११ साली याच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात वेगळे ११७ पट्टकादंब हंस, १०१ व्हुपर स्वान आणि २ म्युट स्वान यांना कॉलर केले. याशिवाय एच-५ एन-१ एन्फ्लुएन्झा या आजाराबद्दल माहिती गोळा करणे हा देखील कॉलरमागील उद्देश होता. २००९ साली पुण्यात पायाला कॉलर केलेला पट्टकादंब हंस आढळून आला आणि त्याच दरम्यान बऱ्याच पक्ष्यांमध्ये एच-१ एन-१ आढळून आला. दरम्यानच्या कालावधीत बरेच पाण्यावरील पक्षी मृत्युमुखी पडले होते. स्थलांतरित पक्ष्यांमुळे एच-१ एन-१ चा धोका असला तरीही पोल्ट्री फॉर्ममुळे हा धोका अधिक आहे. मनुष्यालाही एच-१ एन-१ होऊ शकतो. मात्र, त्याची तीव्रता कमी असते, असे तारिक सानी यांनी सांगितले.
जागतिक संख्येच्या एक तृतीयांश म्हणजे सुमारे ६० हजार ‘बार हेडेड गुज’ पक्षी दरवर्षी हिवाळय़ाच्या सुरुवातीला भारतात येतात. सायबेरिया, मध्य आशिया, तिबेट, लडाख या ५ हजार फुट उंचीवरील ठिकाणांवरील पाणवठय़ांवर त्यांचे प्रजनन होते. इतर पक्ष्यांच्या तुलनेत कमी ऑक्सिजन असतानासुद्धा त्यांची श्वास घेण्याची क्षमता अधिक असते. उन्हाळा हा याचा प्रजननाचा कालावधी असतो. सुमारे २९ हजार फुट उंचीवरून उडण्याची याची क्षमता आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात या पक्ष्याची मोठय़ा प्रमाणावर शिकार होते. पूर्वी भारतातसुद्धा छऱ्र्याच्या बंदुकीने त्याची शिकार केली जात होती. मात्र, स्थलांतरित असले तरीही, भारतीय कायद्याने या पक्ष्याच्या शिकारीवर बंदी आणल्यामुळे भारतात त्याच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे.
एक विशिष्ट आवाज करून आणि ‘व्ही’ आकारात हे पक्षी उडल्यानंतर त्यांच्या कातडीची चमक पर्यावरणवाद्यांना आकर्षित करीत असते. भारतात हिवाळय़ाच्या सुरुवातीला येणारे हे पक्षी भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजेच तामिळनाडूपर्यंत भ्रमण करतात. मंगोलियाप्रमाणेच राजस्थान वनविभाग, अलीगड मुस्लीम विद्यापीठ आणि यूएस फीश अँड वाईल्डलाईफ सव्र्हिस या तिघांनी मिळून दोन ‘बार हेडेड गुज’ला सॅटेलाईट कॉलर केले होते. यातील एक सॅटेलाईट कॉलर केलेला पक्षी २३ मार्च २०००ला भरतपूरच्या केवलादेव नॅशनल पार्क येथे आणि त्यानंतर १८ तासाने २४ मार्चला तो गंगा नदीच्या किनाऱ्यावर आढळून आला.
लोकसत्ता प्रतिनिधी, नागपूर, सोमवार, १३ फेब्रुवारी २०१२
![]() |
Photo:wikipeadia |
के-६० व एक्स-९७ हे दुसऱ्या टप्प्यातील ग्रीन कॉलर केलेले पट्टकादंब हंस आहेत. या दोन्ही पक्ष्यांविषयीची माहिती मंगोलियन पक्षीतज्ज्ञ न्याम्बयार आणि मार्टिन गिल्बर्ट यांना कळविण्यात आली आहे. सलग चार-पाच वर्षांपासून या एकाच ठिकाणी कॉलर केलेले पट्टकादंब हंस येत आहेत आणि अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे पक्षितज्ज्ञांचे म्हणणे आहे.
![]() |
Image Credit:http://birdsmongolia.blogspot.in |
जागतिक संख्येच्या एक तृतीयांश म्हणजे सुमारे ६० हजार ‘बार हेडेड गुज’ पक्षी दरवर्षी हिवाळय़ाच्या सुरुवातीला भारतात येतात. सायबेरिया, मध्य आशिया, तिबेट, लडाख या ५ हजार फुट उंचीवरील ठिकाणांवरील पाणवठय़ांवर त्यांचे प्रजनन होते. इतर पक्ष्यांच्या तुलनेत कमी ऑक्सिजन असतानासुद्धा त्यांची श्वास घेण्याची क्षमता अधिक असते. उन्हाळा हा याचा प्रजननाचा कालावधी असतो. सुमारे २९ हजार फुट उंचीवरून उडण्याची याची क्षमता आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात या पक्ष्याची मोठय़ा प्रमाणावर शिकार होते. पूर्वी भारतातसुद्धा छऱ्र्याच्या बंदुकीने त्याची शिकार केली जात होती. मात्र, स्थलांतरित असले तरीही, भारतीय कायद्याने या पक्ष्याच्या शिकारीवर बंदी आणल्यामुळे भारतात त्याच्या शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे.
एक विशिष्ट आवाज करून आणि ‘व्ही’ आकारात हे पक्षी उडल्यानंतर त्यांच्या कातडीची चमक पर्यावरणवाद्यांना आकर्षित करीत असते. भारतात हिवाळय़ाच्या सुरुवातीला येणारे हे पक्षी भारताच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजेच तामिळनाडूपर्यंत भ्रमण करतात. मंगोलियाप्रमाणेच राजस्थान वनविभाग, अलीगड मुस्लीम विद्यापीठ आणि यूएस फीश अँड वाईल्डलाईफ सव्र्हिस या तिघांनी मिळून दोन ‘बार हेडेड गुज’ला सॅटेलाईट कॉलर केले होते. यातील एक सॅटेलाईट कॉलर केलेला पक्षी २३ मार्च २०००ला भरतपूरच्या केवलादेव नॅशनल पार्क येथे आणि त्यानंतर १८ तासाने २४ मार्चला तो गंगा नदीच्या किनाऱ्यावर आढळून आला.
0 Comments:
Post a Comment